तभा वृत्तसेवा
दिग्रस,
atal-bihari-vajpayee-jayanti : भारतीय जनता पार्टी दिग्रस मार्फत गुरुवार, 25 डिसेंबर रोजी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या अटल स्मृतीवर्ष अभियान अटलजी यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे आयोजन भाजपाकडून करण्यात आले होते. सर्व पदाधिकाèयांसह कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
भाजपाच्या नगरसेवक लक्ष्मी मेहता यांच्या पुढाकारात अभिवादन कार्यक्रमात पुसद जिल्ह्याचे महामंत्री दीपक परिहार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गजानन निचत, शहराध्यक्ष अभय इंगळे, रमेश करवा, म. आतिक म. इस्राईल, सुरेंद्र मिश्रा, हनुमान रामावत, अरुण राठोड, चिराग मेहता, प्रमोद बनगिनवार, सुभाष कटेकर, सतीष मेहता, संजय घरत, वाजीद शेख व कैलास चव्हाणसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.