हिंगणघाट,
Gas agency robbery, येथील गॅस एजन्सीतून ३ लाख ६१ हजारांची रोख चोरून नेणार्या चोरट्यांचा सुगावा पोलिसांना लागला. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली. ती कार चोरट्यांनी भाड्याने घेतली होती, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर रोजी हिंगणघाट पोलिस ठाण्यात येथील सुभाष खत्री यांनी आपल्या गॅस एजन्सीतून ३.६१ लाखांची रोख चोरून नेल्याची तक्रार नोंदविली. तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. याच प्रकरणचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेची चमू करीत होती. तपासादरम्यान एलसीबीच्या चमूने गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या यु. पी. ७८ इ. आर. ४४५५ क्रमांकाच्या कार मालकाचा तांत्रिक पद्धतीने अधिकची माहिती घेत शोध घेतला. त्यानंतर कार मालकाकडून ही कार मुकुल वासनीक याने भाड्याने घेतली असल्याचे पुढे आले. मुकुल वासनीक हा सध्या फरार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, शेखर डोंगरे, विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राऊत, दिनेश बोथकर, अनुप कावळे, अंकित जिभे यांनी केली.