लिओनेल मेस्सी जेव्हा अचानक ताडोबात पोहचतो…

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
नागपूर,
lionel messi भारतीय फुटबॉल चाहत्यांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. १४ वर्षांनंतर अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी भारतात आला आणि ‘गोट इंडिया टूर २०२५’ च्या अंतर्गत चार शहरांमध्ये चाहत्यांना भेट दिली. तीन दिवसांच्या या दौऱ्यात मेस्सी कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या शहरांना भेट देऊन चाहत्यांचा उत्साह वाढवित राहिला. त्याच्यासोबत बार्सिलोनाचा माजी संघमित्र लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा संघमित्र रॉड्रिगो डी पॉल देखील होते.
 

lionel messi 
 
 
कोलकातामध्ये मेस्सीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो चाहते रस्त्यावर जमले होते, त्यांनी अर्जेंटिनाची जर्सी, झेंडे, बॅनर आणि पोस्टर्ससह त्याला पाहण्यासाठी रीजन्सी हॉटेलच्या बाहेर आणि लॉबीमध्ये तासन्तास वाट पाहिली. “मेस्सी, मेस्सी!” अशी घोषणाही शहरभर ऐकू येत होती.
 
 
 
मेस्सी हा युनिसेफचा lionel messi ब्रँड अँबेसेडर असून त्याचाच एक भाग म्हणून तो भारतात ‘गोट इंडिया टूर’ मध्ये सहभागी झाला होता. या दौऱ्यानंतर त्याने गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या वनतारा प्रकल्पाला भेट दिली. वनतारा हा वन्यजीव बचाव, देखभाल आणि पुनर्वसन केंद्र आहे, जिथे मेस्सीनं हत्तीसह फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला आणि सिंहांना जवळून पाहत प्राणी प्रेमाचा अनुभव घेतला. मेस्सीला वनतारा खूप आवडले आणि त्याने येथील प्राणी व वन्यजीवनाबद्दल आनंद व्यक्त केला, तसेच भविष्यात पुन्हा भेट देण्याचा इशारा दिला.मात्र, या दौऱ्यातली चर्चेची बाब बनली ती मेस्सीच्या न झालेल्या ताडोबा दौऱ्यामुळे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात देशविदेशातील दिग्गजांनी भेट दिलेली असते, आणि मेस्सी भारतात आल्यानंतर त्याचे ताडोबाच्या कोलारा गेटवरील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे फोटो एआयच्या माध्यमातून तयार केलेले असले तरी, काही क्षण ते खरेच वाटले आणि चाहत्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला.मेस्सीचा भारत दौरा केवळ फुटबॉल प्रेमींनाच नव्हे तर प्राणी आणि पर्यावरण प्रेमींनाही संस्मरणीय ठरला आहे, तर सोशल मीडियावर त्याच्या ताडोबा दौऱ्याचे चर्चेचे क्षण अजूनही ताजे आहेत.