कॅनडाच्या टोरंटोमध्ये गोळीबार; 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
टोरंटो,
indian student killed कॅनडाच्या टोरंटो शहरात 25 डिसेंबर रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 20 वर्षीय भारतीय विद्यार्थी शिवांक अवस्थी यांचा मृत्यू झाला. टोरंटो विद्यापीठाच्या स्कारबरो कॅम्पसजवळ अंधाधुंद गोळीबार झाला होता. या घटनेबद्दल टोरंटोतील भारतीय वाणिज्य दूतावासाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
 

शिवांक अवस्थी
 
 
भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर निवेदन जारी करत म्हटले आहे की, “टोरंटो विद्यापीठाच्या स्कारबरो कॅम्पसजवळ झालेल्या गोळीबारात युवा भारतीय डॉक्टरेट विद्यार्थी शिवांक अवस्थी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आम्ही अत्यंत शोकाकुल आहोत. या कठीण प्रसंगी दूतावास कुटुंबाच्या संपर्कात असून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक ती सर्व मदत करत आहे.”
पोलिस तपास सुरू
‘टोरंटो सन’च्या वृत्तानुसार, गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. तेथे गोळी लागून गंभीर जखमी झालेला एक युवक आढळला, ज्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिस येण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. तपासासाठी परिसर सील करण्यात आला आहे. यावर्षी टोरंटोमधील ही 41 वी हत्या असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच टोरंटोमध्ये भारतीय नागरिक हिमांशी खुराना यांच्या हत्येचीही घटना समोर आली होती.
हिमांशी खुरानांची हत्या
भारताची रहिवासी असलेल्या 30 वर्षीय हिमांशी खुराना यांची टोरंटोमध्ये हत्या करण्यात आली. या प्रकरणात त्यांचा 32 वर्षीय पार्टनर अब्दुल गफूरी संशयित असल्याचा पोलिसांना संशय आहे.indian student killed प्राथमिक तपासात हा प्रकार कौटुंबिक/पार्टनर हिंसेचा असल्याचे संकेत मिळत आहेत. हिमांशी यांच्या मृत्यूवरही भारतीय दूतावासाने शोक व्यक्त केला होता.