अमरावती,
devendra-fadnavis : श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवाचा मुख्य सोहळा २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात होत आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला पद्मभूषण डॉ. विजय भटकर, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे, खा. बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रताप अडसड अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
सकाळी ९ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतीकेंद्र येथील भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात येऊन आदरांजली अर्पण करण्यात येईल. मुख्य सोहळ्यात शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार, शेतकरी नेता शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख शेतीनिष्ठ पुरुष शेतकरी पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृती २०२५ चे वितरण करण्यात येईल तसेच शिवसंस्था मासिक व दैनंदिनी २०२६ चे विमोचन करण्यात येईल. या सोहळ्याला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर, अॅड. जे. व्ही. पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेश खोटरे, प्रा. सुभाष बनसोड, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, विजय ठोकळ, डॉ. पुरुषोत्तम वायाळ, प्राचार्य डॉ. अमोल महल्ले प्रामुख्याने उपस्थित राहतील. या मुख्य सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, अशी विनंती संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. वि. गो. ठाकरे यांनी केली आहे.