Dadarao Keche नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पराभूत झालेल्या चार महिला उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमच्याबद्दल आपण अभद्र टिप्पणी तसेच विरोधामध्ये प्रचार केल्याबद्दल विधानपरिषद सदस्य दादाराव केचे यांना महिलानी जाब विचारला.
निवडणुकीच्या Dadarao Keche प्रचारादरम्यान आपण भारतीय जनता पक्षाचे असताना आपण आमच्या विरोधामध्ये प्रचार करून विरोधी उमेदवाराला विजयी करण्याकरता प्रयत्न केले यासंबंधी आपण आम्हाला उत्तर द्यावे याकरता जाब विचारत असताना विधानपरिषद सदस्य त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते मात्र महिला उमेदवार आक्रमक झाल्या होत्या. नगरपालिकेसमोर हा प्रकार घडत असताना मोठ्या प्रमाणावर बघायची गर्दी त्या ठिकाणी गर्दी जमा झाल्यामुळे पोलिसांना प्राचारण करण्यात आले.अनेकांनी महिलांना समजवण्याचा प्रयत्न केला असता हा आमचा पक्षांतर्गत विषय असून आम्हाला त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असे महिलांची उत्तरे होती.काल संध्याकाळी विधान परिषद सदस्य दादाराव केचे यांच्याशी ज्या प्रकारचा व्यवहार महिलांनी केला त्याच्या विरोधामध्ये आज आर्वी बंदची हाक देण्यात आली आहे