तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
contractor-is-a-thief : राणाप्रताप गेट परिसरातील भारमल हार्डवेअर सिंमेटच्या दुकानातून काऊंटवर ठेवलेली बॅग चोरी झाली होती. याप्रकरणी व्यवसायाने ठेकेदार असलेला आरोपी दिनेश मंडाले (वय32, तळेगाव भारी) याला ताब्यात घेतले आहे. तक्रारदार साबीर हुसेन कमरूदीन भारमल (यवतमाळ) यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात त्यांच्या भारमल हार्डवेअर सिमेंटच्या दुकानातून गुरुवार, 25 डिसेंबरला सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली 5 लाख 42 हजार 200 रुपयांची बॅग चोरून नेली, अशी तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेल्या आदेशावर अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील पथकाने गुन्ह्याच्या तपासात ही चोरी तळेगाव (भारी) येथील आरोपी दिनेश मंडाले यानेच केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी मंडालेला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी गेलेली रोख 5 लाख 42 हजार 200 रुपये, गुन्हयात वापरलेली दुचाकी, मोबाईल असा एकूण 6 लाख 32 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे व पोलिस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या तपास पथकातील श्रीकांत जिंदमवार, सूरज जगताप, आकाश माळगे, गजानन वाटमोडे, सुरेश मेश्राम, बलराम शुक्ला, विठ्ठल चव्हाण, रूपेश ढोबळे, योगेश चोपडे, नितीन खवडे, सचिन राठोड, गजानन राजमल्लू यांनी केली.