देवळीत नगरसेवक जिंकले पण नगराध्यक्ष पडले!

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
 वर्धा,
Deoli municipal election, भारतीय जनता पक्षाला देवळी येथे नगरसेवकांच्या माध्यमातून यश मिळाले. मात्र, काहींनी नगराध्यक्ष पद पाडण्याचा सुनियोजित खेळ केल्याचा आरोप केल्या जात आहे.
 

Deoli municipal election, 
देवळी येथे नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या अधिकृत उमेदवार शोभा रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काहींनी नेहमीप्रमाणे, अंतर्गत विरोध, गैरसमज पसरवणे, तिकीट वाटपाच्या वेळी पक्षालाच चुकीची माहिती देणे हीच नीती यावेळीही अवलंबली. आता नगरपरिषदेत झालेला प्रकार जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत होण्याची शयताही वर्तवल्या जात आहे.
अनेक नगरसेवकांनी स्वतःसाठी मत मागितले. पण, भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी प्रचारच केला नसल्याची चर्चा आता शहरात जोर धरू लागली आहे.
 
 
देवळी नगराध्यक्ष पदासाठी फत ८०० मतांची कमतरता होती. प्रत्येक प्रभागातून फत ५० मतं जरी प्रामाणिकपणे मागितली असती तर निकाल वेगळा असता, असा विश्वास व्यत केल्या जात आहे.देवळी येथे माजी खासदार रामदास तडस यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला. जिल्ह्यात नाही तसे इंनडोअर स्टेडिअम तयार केले. त्या स्टेडिअमची भुरळ अनेक नेत्यांनी पडली. वर्धेसारख्या जिल्हास्थानावर नसलेल्या नाट्यगृहाची निर्मितीही केली. नगर पालिकेची इमारत बांधण्यात आली. दोन वेळा खासदार राहिेलेले रामदास तडस यांची वेगळी ओळख होती. रामदास तडस यांनी नगराध्यक्ष ते खासदार असा प्रवास केला आहे. नगर पालिकेच्या विकासाचा अजेंडा त्यांना पाठ आहे. तर येथे एकदा नगराध्यक्ष राहिलेल्या शोभा तडस यांच्या काळातही येथे मोठ्या प्रमाणात देवळीत विकास कामं झाली. शोभा तडस यांना यावेळी नगराध्यक्षपदाची तिकीट देण्यात आली होती. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. अशोक उईके, पालकमंत्री पंकज भोयर, माजी खासादर नवनीत राणा यांनीही प्रचार सभा घेतल्या. आक्षेपापुर्वी देवळीतील मतदारांचा कौल शोभा तडस यांच्या बाजूला होता. आक्षेपानंतर २० डिसेंबरला झालेल्या निवडणुकीतही शेवटच्या टप्प्यातील प्रचारात शोभा तडस यांच्या विजयाचा विश्वास होता. परंतु, नगरसेवक जिंकले आणि नगराध्यक्ष हरले, अशी परिस्थिती देवळीत निर्माण झाली.