डिजिटल न्याय पद्धतीच्या माध्यमातून जलद प्रभावी तक्रार निवारण : डॉ. वर्मा

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
ks-verma : पूर्वी तक्रार निवारणासाठी ग्राहकांना विविध ठिकाणी फेरे मारावे लागत होते. त्यात वेळ, पैसा व शारीरिक श्रम वाया जात होता. डिजिटल तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना कमी वेळात, कमी पैशात विना अडथळा जलद न्याय मिळवून घेण्याचे द्वार उघडल्या गेले आहे, असे प्रतिपादन ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. केएस वर्मा यांनी केले.
 

y26Dec-Varma 
 
ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. घरबसल्या सहजपणे ऑनलाईन ई-फाईलिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदारे साक्ष देणे, कागदखर्चाची व वेळेची बचत, वकिलांच्या मध्यस्थीशिवाय न्याय मिळवून घेण्याच्या सुविधा डिजिटल व्यवस्थेत उपलब्ध झालेल्या आहेत.
 
 
कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन पेमेंट अशा सुविधांमुळे नागरिकांचे ग्राहकांचे जीवनमानात आमूलाग्र बदल झाला आहे. जीवन सुखकर झाले आहे. त्याचवेळेस सायबर क्राईम, बँक, एटीएम, ऑनलाईन प्रक्रियेतील फ्रॉड, डिजिटल अरेस्ट यामुळे ग्राहकांना ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे मत ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. केएस वर्मा यांनी व्यक्त केले.
 
 
ग्राहकांचे हक्क व कर्तव्यासोबत ग्राहक पंचायत व तक्रार निवारण आयोगाची कार्यपद्धतीबाबत माहिती कोषाध्यक्ष भूपेंद्र कारिया यांनी दिली. बँकेद्वारे ग्राहकांना दिल्या जाणाèया विविध सुविधांची माहिती देऊन बँकिंग, एपिके फाइल्स यापासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीची माहिती बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक भूषण चिंचवलासपुरे यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात नायब तहसीलदार भगत यांनी ग्राहक जागृतीची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन पुरवठा निरीक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी केले. ग्राहकांच्या जागृतीसाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे पुरवठा विभागाने माहिती सादर केली.
मंचावर नायब तहसीलदार किरण किनाके, वडकी शाखेचे सचिव हरिभाऊ नंदुरकर उपस्थित होते. ग्राहक पंचायतचे सदस्य माजी प्राचार्य सुरेंद्र ताठे, प्रा. गजानन घुंगरूड, नंदकिशोर टिपणवार, अमर ठाकरे, भावना खनगन, वडकी शाखेचे अध्यक्ष अशोक फुटाणे उपस्थित होते. पुरवठा निरीक्षक संघप्रिय भवरे व त्यांच्या सहकाèयांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
पाच महाविद्यालयात झाल्या भाषण व निबंध स्पर्धा
 
 
शहरातील पाच महाविद्यालयात भाषण व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे झालेले बदल या भाषण स्पर्धेत नंदिनी खडसे, जान्वी देशमुख, स्नेहा वारकट, ध्रुव कारमोरे, ‘निद्रिस्त ग्राहक एक सामाजिक समस्या’ या निबंध स्पर्धेत हर्षिता सांबरे, मंथन वाकुलकर, वैष्णवी अवसरमल, जागृती डायरे, रुचिता पटेलपैक यांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.