नागपूर,
gajanan-maharaj-payadal-palakhi : श्री संत गजानन सेवा समिती, टिमकी, तीन खंबा चौक तर्फे दरवर्षी यंदाही गजानन महाराजांची नागपूर ते रामटेक पायदळ पालखी यात्राचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३ ते ६ जानेवारी दरम्यान ही पालखी मार्गस्थ होईल.

हरिहर गजानन निवास, टिमकी, तीन खंबा चौक येथून ३ जानेवारीला सकाळी ६ वाजता पायदळ पालखी मार्गस्थ होऊन जागनाथ लालगंज खैरीपुरा,प्रेमनगर, शांतीनगर, कुत्ते वाले बाबा,भवानी मंदिर, कळमना, कामठी मार्गे सत्रापुर कन्हान येथे काली माता मंदिरात रात्रीच्या मुक्कामाकरिता थांबणार आहे. रविवार ४ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता पालखी कन्हान नगर प्रदक्षिणा करून दुपारी बोरडा मार्गे संध्याकाळी पावणे सहा वाजता मोहिते सेलिब्रेशन हॉल, नगरधन येथे रात्रीच्या विसाव्या करिता थांबेल. सोमवार, जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता पालखी नगरधन वरून प्रस्थान करून शनी मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर शीतलवाडी मार्गे गडमंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल. मंगळवार, ६ जानेवारी रोजी सकाळी आरती व महाप्रसाद घेऊन नागपूरला संध्याकाळी साडे सहा वाजता श्री हरिहर गजानन निवास टिमकी येथे पोहोचणार असल्याची माहिती श्री संत महाराज सेवा समितीचे श्याम गडवे यांनी दिली आहे.