तभा वृत्तसेवा
पुसद,
pusad-news : बांग्लादेशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तेथे इस्लामी कट्टरता वाढून हिंदूंवर अत्याचार वाढत आहेत. दिवसागणिक हिंदू मंदिर, घर, दुकाने यांच्यावर सतत हल्ले होत आहेत. यातच एक हिंदू श्रमिक दीपू दास याच्यावर हल्ला करून त्याला जिवंत मारण्यात आले. कट्टरता दाखवत पुन्हा जाळण्यात आले. तरी तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबावे व त्यांना भीतीमुक्त वातावरणात जगता यावे, यासाठी या घटनेचा निषेध म्हणून सर्व राष्ट्रप्रेमी व धर्मप्रेमी बंधू-भगिनींनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे इस्लामी कट्टरपंथीचा पुतळा दहन करून निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी विहींपचे केंद्रीय सदस्य नारायण महाराज, जिल्हाध्यक्ष भारत पेन्शनवार, जिल्हा मंत्री बालाजी कामिनवार, पुसद जिल्हा संघचालक डॉ. पंकज जयस्वाल, सुरेश गोफणे, रवी ग्यानचंदानी, वैभव फुके, भारत पाटील, आशीष प्रतापवार, दीपक परिहार, विजय पुरोहित, विक्रांत जिल्हेवार, दीपाली जाधव, वैष्णव ढोकणे, गोपाल जाधव, सुनीता तगलपल्लेवार, रीना भट्टड, प्रतीभा पांडे, नारायण पुलाते, अरुण मोटे, सतीश पारटकर, योगेश पांडे, महेश काळे, संजय पांडे व असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.