कारंजा लाड,
stray dog न्यायालयाच्या निर्देशांनुसार स्पष्ट कारंजा नगरपरिषदेच्यावतीने शहरातील मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नसबंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना भेडसावणार्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नगराध्यक्ष stray dog फरीदाबानू पुंजानी व मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाने या मोहिमेचे सुनियोजित नियोजन केले आहे. एका खासगी कंपनीच्या प्रशिक्षित पशुवैद्यकीय डॉटरांच्या देखरेखीखाली श्वाननांची शास्त्रशुद्ध पद्धतीने नसबंदी केली जात आहे. यासाठी दारव्हा रस्त्यावरील मुस्लिम कब्रस्तानाच्या मागे टिनपत्र्याचे सुसज्ज ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहे. नसबंदीनंतर संबंधित श्वानावर आवश्यक औषधोपचार व लसीकरण करून त्यांना सुरक्षितपणे सोडण्यात येत आहे. या मोहिमेमुळे मोकाट श्वानांची अनियंत्रित वाढ रोखली जाणार असून, त्याचे सकारात्मक परिणाम आगामी एक ते दोन वर्षांत दिसून येतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला विशेष म्हणजे आहे. नसबंदीबरोबरच श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जात असल्याने चाव्याच्या घटनांनंतर मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शयता कमी होणार आहे. दरम्यान, शहरातील विविध प्रभागांमध्ये मोकाट कुत्र्यांमुळे होणार्या चाव्याच्या घटना, भीतीचे वातावरण तसे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही मोहीम अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्वानांवर कोणताही अमानुष अत्याचार न करता, कायदेशीर व मानवी मार्गानेच संख्या नियंत्रण करणे बंधनकारक असल्याने त्याच धर्तीवर ही मोहीम राबविली जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, मोकाट श्वानांबाबत कोणतीही अडचण अथवा माहिती असल्यास नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.