मानसिक आरोग्यासाठी डिमेन्शिया जागृती सत्र

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Mindpark Foundation माइंडपार्क फाउंडेशन आणि श्री सिद्ध हनुमान मंदिर पंच कमेटी, लक्ष्मी नगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला डिमेन्शिया जागरूकता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. हा कार्यक्रम लक्ष्मी नगर येथील श्री सिद्ध हनुमान मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता.माइंडपार्क फाउंडेशन हे मानसिक आरोग्य आणि वृद्धांच्या देखभालीबाबत समाजात सातत्याने जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करत आहे. त्याच अनुषंगाने प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कुमार कांबळे यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली डिमेन्शियाविषयी एक प्रभावी व माहितीपूर्ण सत्र आयोजित करण्यात आले.
 

sw  
 
 
या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञ डॉ. स्वाती धर्माधिकारी आणि डॉ. उर्मिला क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री सिद्ध हनुमान मंदिर पंच कमेटीच्या कार्यकारी अध्यक्षा वैष्णवी पतकी, उपाध्यक्ष हेमंत सहस्रबुद्धे व इतर सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.कार्यक्रमातील प्रश्नोत्तर सत्र विशेष आकर्षण ठरले. उपस्थितांना डॉ. कुमार कांबळे आणि डॉ. स्वाती धर्माधिकारी यांच्याशी थेट संवाद साधण्याची व डिमेन्शिया संदर्भातील विविध शंका दूर करण्याची संधी मिळाली. यावेळी डिमेन्शिया विषयक प्राथमिक स्तरावरील प्रश्नावली उपस्थितांकडून भरून घेण्यात आली.Mindpark Foundation त्याचा पुढील पाठपुरावा करण्यात येणार आहे.कार्यक्रमात डिमेन्शियावर आधारित प्रभावी लघुपट दाखविण्यात आला. तसेच माइंडपार्क फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या राईट ब्रेन अ‍ॅक्टिव्हिटी संदर्भातील माहितीपूर्ण क्लिपही सादर करण्यात आली. उपस्थितांच्या प्रचंड उत्साहामुळे भविष्यातही अशाच प्रकारचे सत्र आयोजित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माइंडपार्क फाउंडेशनच्या समाजकार्यकर्त्या आरती मुनीश्वर यांनी केले, तर समन्वयक मिलिंद खोपकर यांनी कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सुरळीतपणे पार पाडली.
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र