नागभीड-तळोधी मार्गावर रेल्वे क्रॉसिंग कायम बंद

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
नागपूर,
railway-crossing-closed : दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत येणार्‍या. नागभीड-तळोधी मार्गावरील समपार रेल्वे फाटक क्रमांक जीसीएफ-७८. नेहमीसाठी बंद करण्यात येणार आहे. या फाटकावरून होणारी मोठ्या प्रमाणावरील वाहतूक तसेच रेल्वे गाड्यांच्या वर्दळीमुळे वारंवार होणारा अडथळा लक्षात घेता या ठिकाणी लो सबवे (एलएचएस) बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. ते काम पूर्ण झाले असून चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडून लेव्हल क्रॉसिंग ३० डिसेंबर सकाळी ६ वाजल्यापासून सर्व प्रकारच्या रस्ते वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या रेल्वे फाटकामार्गे जाणारी संपूर्ण रस्ते वाहतूक आता नव्याने बांधण्यात आलेल्या लो हाइट सबवेच्या सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवास करताना या बदलाची नोंद घ्यावी आणि निश्चित केलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाच्या नागपूर विभागाने केले आहे.
 
 

ngp