अनिल कांबळे
नागपूर,
Pranay Nanaware murder सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल प्राइडसमोर एका युवकाचा चार ते पाच युवकांनी चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना आज, शुक्रवारी पहाटे सुमारे पाच वाजताच्या सुमारास घडली. प्रणय ननावरे असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Pranay Nanaware murder प्रणय ननावरे हा दाबो पबमध्ये गेला असताना नाचण्याच्या कारणावरून त्याचा काही युवकांशी वाद झाला. पबमध्ये झालेला हा वाद काही वेळातच गंभीर वळणावर गेला. पबमधून बाहेर पडल्यानंतर संबंधित चार ते पाच युवकांनी प्रणयचा पाठलाग केला आणि हॉटेल प्राइडसमोर त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या प्रणयला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.