नागपूर,
Porwal Junior College विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने स्तुत्य उपक्रम राबविणारे सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय, कामठी हे नेहमीच आदर्शवत कार्यासाठी ओळखले जाते.हिरक जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित तीन दिवसांच्या स्नेहसंमेलनात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोस्टर, रांगोळी व मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी बेटी बचाव–बेटी पढाव, पर्यावरण संरक्षण, नवीन शैक्षणिक धोरण, प्रदूषण, भ्रूणहत्या, वाढते रस्ते अपघात यांसारख्या सामाजिक विषयांचे प्रभावी चित्रण केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कवी सुरेश भट यांसारख्या महापुरुषांची चित्रे रेखाटून त्यांनी आपल्या कलागुणांची चुणूक दाखवली.

स्नेहसंमेलना दरम्यान आयोजित रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत व भावगीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.Porwal Junior College संजीवनी खुरपडी आणि प्रियांशी कडू या विद्यार्थिनींनी ‘हीच आमची प्रार्थना’ आणि ‘एक राधा एक मीरा’ ही गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळालेच, शिवाय समाजभान जपणाऱ्या कलेतून वास्तवाचे प्रभावी दर्शन घडले, हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.
सौजन्य:सुधीर अग्रवाल,संपर्क मित्र