शरद पवारांना धक्का! प्रशांत जगताप यांचा राजीनामा

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
पुणे,
prashant jagtap आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी १२ वाजता मुंबईतील दादर येथील टिळक भवन (दादर भवन) येथे त्यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. याबाबतचा निर्णय जवळपास अंतिम झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
 

prashant jagtap  
पुण्यात prashant jagtap राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होण्याच्या हालचाली सुरू असताना प्रशांत जगताप यांनी या युतीला तीव्र विरोध दर्शवला होता. युती झाल्यास आपण पदाचा राजीनामा देऊ, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यापूर्वी दिला होता. अखेर काल त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शहराध्यक्षपदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
 
 

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
 
 
प्रशांत जगताप यांच्या prashant jagtap राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. भाजप, काँग्रेस, शिवसेना तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट यांसह विविध पक्षांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती होती. मात्र, अखेर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर व्यक्त होताना प्रशांत जगताप यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आपण राजीनामा देत आहोत. आजवर मिळालेल्या संधींसाठी त्यांनी नेतृत्वाचे आभार मानले. २७ वर्षांपूर्वी सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रवेश करताना कोणतेही पद डोळ्यांसमोर न ठेवता पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्याच्या उद्देशाने आपण काम सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले. आजही तेच ध्येय कायम असून पुढेही पुरोगामी विचारांसाठी आपली सामाजिक व राजकीय वाटचाल सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आतापर्यंत निष्ठेने साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानले.
 
 
प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पुण्यातील महापालिका निवडणुकीपूर्वीचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि पक्षांतराच्या राजकारणावर यामुळे अधिकच लक्ष केंद्रीत झाले आहे.