ढाका,
tariq-rahman-receives-death-threats बांग्लादेशातील जमात-ए-इस्लामी संघटनेकडून माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमानला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जमात-ए-इस्लामीशी संबंधित वकील बॅरिस्टर शाहरियार कबीरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये तो उघडपणे तारिक रहमानला धमकी देताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये भारताविरोधातही तीव्र आणि चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे, तब्बल १७ वर्षांनंतर तारिक रहमान बांग्लादेशच्या भूमीवर परतला आहे आणि त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने देशातील राजकीय वातावरण तापले आहे. व्हिडिओमध्ये शाहरियार कबीर म्हणाला की, तारिक रहमान भारताच्या अटी मान्य करून आपल्या वडिलांच्या वारशाशी विश्वासघात करत आहेत. भारतावर विश्वास ठेवू नये, असा इशारा देत ते म्हणतात की, जर भारताशी करार करून या देशात आलात, तर तुमचा अंत जवळ आहे. tariq-rahman-receives-death-threats अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या रक्ताचा विश्वासघात करत आहात, असेही तो म्हणाला. पुढे बोलताना शाहरियार कबीरने तारिक रहमानच्या कुटुंबीयांच्या इतिहासाचा उल्लेख करत धमकीचा सूर अधिक तीव्र केला. त्यानी दावा केला की, तलपत्ती बेट न देण्याच्या मुद्द्यावरून १५ दिवसांत तुमच्या वडिलांची हत्या करण्यात आली. फरक्का बॅराज आणि पाणीवाटप करार रद्द करण्याची भाषा तुमचे वडील करत होते, तर तुमच्या आईने पाण्याच्या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली होती. याच कारणामुळे त्यांना देशाबाहेर जावे लागले, असा आरोप त्यानी केला.
शाहरियार कबीर यांनी पुढे असेही म्हटले की, तुम्हाला अजून मृत्यूच्या वेदनेचा अनुभव आलेला नाही. जर तुम्ही भारतावर विश्वास ठेवत असाल, तर तोच तुमच्या मृत्यूचे कारण ठरेल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. या धमकीमुळे बांग्लादेशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तारिक रहमान यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.