दुर्दैवी घटना मद्यधुंद ट्रॅक्टर चालकामुळे भीषण अपघात

चार वर्षीय बालकाचा मृत्यू

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
लाखांदूर,
tractor accident शहरात आज 26 डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने रस्त्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार वर्षीय बालकासह ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णापायात मृत्यू झाला .या अपघातात दक्ष अवसरे (वय ४ वर्षे) असे मृतकाचे नाव असून निलेश अवसरे (वय अंदाजे २८ वर्षे), दोघेही रा. लाखांदूर हा गंभीर जखमी आहे.

tractor accident, drunk driver, fatal accident, child death, road accident, Lakhandur,
 
 
प्राप्त माहितीनुसार, tractor accident निलेश अवसरे हा ट्रॅक्टरमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत कामानिमित्त बाहेर जात असताना सदर ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जात होता. याचदरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट डिव्हायडरला धडकला.अपघात इतका भीषण होता की डिव्हायडरवरील लोखंडी कठडे चिरडले गेले आणि ट्रॉली रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.उपचारादरम्यान चार वर्षीय दक्ष अवसरे याला गंभीर स्वरूपाची (इंटरनल हेड इंजुरी) झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे रेफर करण्यात आले आहे.तर उपचारा दरम्यान बालकाचा मृत्यू झाला.तर निलेश अवसरे यांच्यावर लाखांदूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, प्राप्त माहितीनुसार सदर ट्रॅक्टरचा चालक हा अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मृतक दक्ष अवसरे हा ट्रॅक्टर चालकाचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे
 
 
या घटनेमुळे लाखांदूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.