नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे ११ गाड्या रद्द

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
नागपूर,
trains-cancelled : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील डोंगरगढ स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामे सुरू करण्यात आली आहेत. नॉन-इंटरलॉकिंग वर्क २७ डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. या कामामुळे काही मेमू पॅसेंजर गाड्यांचे संचालन प्रभावित होणार असून, विभागातील १०, तसेच रायपूर विभागातील ११ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
 
 

ngp 
 
 
५८२०६ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-रायपूर पॅसेंजर, ६८७११ डोंगरगढ-रायपूर मेमू, ६८७१३ गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू, ६८७१४ नेताजी सुभाषचंद्र ब्रोस इतवारी-बालाघाट मेमू, बालाघाट-नेताजी बोस इतवारी मेमू, ६८७१६ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-गोंदिया मेमू आणि ६८७१२ गोंदिया-डोंगरगढ मेमू २८ आणि २९ ६८७१० डोंगरगढ़-रायपूर मेमू गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच २७डिसेंबरला १० मेमू पॅसेंजर, २८ डिसेंबरला ९ मेमू पॅसेंजर गाड्या आणि २९ डिसेंबर रोजी १ मेमू पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे.