तभा वृत्तसेवा
दिग्रस,
vaijnath-munde : शिवकालीन गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवतेजसारख्या सेवाभावी संस्थांनी एकत्रित येऊन हे कार्य राज्यभर केले पाहिजे, असे गौरवोद्गार दिग्रसचे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी काढले. शिवतेज किल्लोत्सवाच्या एकोणविसाव्या बक्षिस व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
महाराष्ट्र हा गडकोट किल्ल्यांचा प्रदेश आहे. महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालीन गडकोट किल्ले यांच्याशिवाय पूर्णच होत नाही. विद्यार्थी दशेतूनच गडकोट किल्ले स्वत: तयार करून, शिवकालीन किल्ल्यांविषयी आवड निर्माण करण्याचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्फुल्लिंग युवकांत निर्माण करण्याचे कार्य शिवतेज संस्था मागील 19 वर्षांपासून सातत्याने करीत आहे. हे आजच्या विद्यार्थी, युवकांच्या उत्स्फूर्तपणे मिळालेल्या प्रतिसादातून दिसून येते. शिवकालीन गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवतेजसारख्या सेवाभावी संस्थांनी एकत्रित येऊन हे कार्य राज्यभर केले पाहिजे, असे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ. गणेश महाजन होते. तर प्रमोद सूर्यवंशी, गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, वाल्मिक इंगोले, सहायक पोलिस निरीक्षक राजेश लाखकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यंदाच्या शिवतेज किल्लोत्सवात तब्बल 50 किल्ल्यांची उभारणी करण्यात आली होती. शेकडो स्पर्धक व पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. वैयक्तिक व सांघिक अशा दोन विभागात स्पर्धेतील किल्ल्यांची विभागणी करण्यात आली. वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक सोहम किरण थोरात, द्वितीय क्रमांक यश दीपक बरडे, तृतीय क्रमांक अमोल भारत झरकर, चतुर्थ क्रमांक ओम सुनील कांडलकर व मधुरा मनीष धोपे यांनी पटकावला.
सांघिक स्पर्धेत प्रथम क्रमांक सुधाकरराव नाईक विद्यालय धानोरा (बु) द्वितीय क्रमांक पालेश्वर किल्लोत्सव मंडळ, तृतीय क्रमांक विनायक किल्लोत्सव मंडळ दिग्रसने पटकावला. सहभागी सर्वच स्पर्धकांना स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. परीक्षक संजय निरपासे, रेवन वानखेडे, स्नेहा चिंतावार, भीमराव करे, मनीष जाधव यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शिवतेजचे संतोष झाडे, सुशील घोलप, संजीव लोखंडे, विजयालक्ष्मी झाडे, डॉ. माणिक मुनेश्वर, रमेश पवार, हरीचंद जाधव, राजेंद्र सप्रे, अमोल राठोड, अमोल झरकर, ममता झाडे, सचिन तामसे, संदीप झाडे, अमर शिंदे यांनी परीश्रम घेतले. आभार रवी देवघरे यांनी मानले.