तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
short-term-employable-training : आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांनी केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याने शासनाच्या वतीने जिल्ह्यात अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 18 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व 6 शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये राबविण्यात येणाèया या कार्यक्रमाच्या दुसèया टप्प्यासाठी जानेवारी ते मार्च 2026 या सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असून प्रशिक्षणार्थींनी मिळवलेल्या कौशल्यामुळे दुसèया टप्प्यासाठी युवकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 2025-26 या वर्षातील दुसरा टप्पा जानेवारीपासून सुरू होत असून यामध्ये तांत्रिक प्रशिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे.
या अल्पमुदतीच्या प्रशिक्षणात सोलर एनर्जी, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, एलईडी लाईट रिपेअर, लाईट मोटर व्हेईकल ड्रायव्हर, इलेक्ट्रिक व्हेईकल सर्व्हिस असिस्टंट, ऑटोमोटीव्ह बॉडी रिपेअर आदी नवयुगीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या संधी तसेच स्वयंरोजगारासाठी शासकीय कर्ज योजनांचे मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाèयांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय आयअीआय अथवा तांत्रिक विद्यालयात संपर्क साधावा, असे कळविले आहे.