यवतमाळ नाट्यगृहाला महात्मा ज्योतिबा फुलेंचा नामफलक

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-theatre : यवतमाळात अनेक वर्षांपासून होत असलेल्या नाट्यगृहाला अखेर महात्मा ज्योतिबा फुले यांचा नामफलक शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी लावण्यात आला. 2007 मध्येच तत्कालीन नगरसेवक सुवर्णा देविदास अराठे यांनी मागणी केल्यावरून नगरसेवक दत्ता कुळकर्णी यांनी अनुमोदन देऊन 28 नगरसेवकांनी आणि नप अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यासाठी मंजुरी दिली होती.
 
 
 
y26Dec-Jyotiba
 
 
 
नगर परिषदेने नाट्यगृहाचे प्रवेशद्वार व आत त्वरित नाव लावावे, यासाठी अप राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनयना येवतकर तसेच अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनीही नगर परिषदकडे मागणी केली होती. त्याचा येवतकर यांनी पाठपुरावा करीत नाव त्वरित लावण्याची विनंती केली होती. अन्यथा उपोषण व आत्मदहनाचा इशारासुद्धा दिला होता. नुकतेच नगर परिषदेच्या निवडणूक संदर्भात कर्मचाèयांच्या प्रशिक्षण पत्रात काढलेल्या आदेशाने शासनाने नाट्यगृहाचा उल्लेख ‘महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह’ असा केलेला होता, हे उल्लेखनीय.
 
 
याकरिता अप राकाँ महिला जिल्हाध्यक्ष सुनयना येवतकर यांनी नगर परिषद, तसेच लोकप्रतिनिधींनी जी सक्रियता दाखविली त्याबद्दल पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री मंत्री डॉ. अशोक उईके, माजीमंत्री मदन येरावार, नगर परिषद मुख्याधिकारी तथा शासनाचे आभार मानले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.