कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाब जाधव पदावरून पायउतार

15 संचालक विरूद्ध शुन्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
महागाव,

Agricultural Produce Market Committee, तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाब लोभा जाधव 18 पैकी 16 संचालकाच्या वतीने जिल्हा अधिकाèयांच्या कार्यक्षेत्रात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत 15 विरूद्ध शुन्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
 

 Agricultural Produce Market Committee, 
हा अविश्वास ठराव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनिमयन) अधिनियम 1963 च्या कलम 23 (अ) अंतर्गत सादर करण्यात आला होता. बाजार समितीच्या कामात मनमानी, संचालकांना विश्वासात न घेणे, आर्थिक निर्णयातील पारदर्शकतेचा अभाव, मासिक सभेत चर्चा न करता परस्पर आदेश काढणे, तसेच बहुमताने मंजूर ठरावाची अंमलबजावणी न करणे भोवल्याने अखेर 26 डिसेंबर रोजी 15 विरूद्ध शुन्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला.
 
 
यात सभापती गुलाब जाधव यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. यावेळी रामेश्वर करपे, गजेंद्र देशमुख, वासुदेव नेवारे, किशोर देशमुख, विनोद राऊत, कृष्ण राऊत, निरंजन धनगर, रवी पवार (कोदंरी), उकंडा राठोड, पुंडलिक भुरके, परमेश्वर जाधव, विजय कृष्णापुरे, रितेश पुरोहित, विनोद भगत, पुष्पा ठाकरे या संचालकांची उपस्थिती होती.