हिंगणघाट,
protests-in-hinganghat : बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात शहरातील कारंजा चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच बांग्लादेशच्या पंतप्रधानांच्या फोटोला चपलांचा हार घालून बांग्लादेशाचा झेंडा जाळून संतप्त भावना व्यत करण्यात आल्या.
बांग्लादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले हल्ले, बळजबरी धर्मांतर, मालमत्तेची तोडफोड व जीवितहानी तात्काळ थांबवावी, भारत सरकारने व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन बांग्लादेश सरकारवर कठोर कारवाईसाठी दबाव आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात रा. स्व. संघांचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, प्रमोद हंबर्डे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजा महाराज शेंडे, भाजपाचे सुभाष कुंटेवार, विहिंपचे जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख अजय भोंग, जिल्हा सहसेवा प्रमुख ओमप्रकाश मस्कर, हिंगणघाट प्रखंड विहिंपचे अध्यक्ष सुरेंद्र आगरे, हिंगणघाट शहर विहिंप अध्यक्ष गजानन मसाये, जिल्हा बजरंग दल सुरक्षा प्रमुख प्रशांत तिवारी, श्याम इडपवार, हिंगणघाट प्रखंड विहिंप मंत्री देवा वाघमारे, सहमंत्री अतुल सूर, हिंगणघाट नगर मंत्री राम पोतदार, सहमंत्री रोशन चंदनखेडे, संदीप मोटवानी, नगर बजरंग दल संयोजक संदीप नासरे, सागर चांगलानी, पंकज देशपांडे, दिनेश वर्मा, गौरव तांबोळी, अमोल त्रिपाठी, संतोष बघेल, रवी खंडाळकर, महेंद्र खासरे, सुरेश बुराडकर, मारोती सहारे, रवी नौकरकर, धर्मा जोशी, सूरज वरठी, हिंगणघाट प्रखंड सहसंयोजक आदर्श सुपारे, हर्षल लाखे, जय आष्टणकर, राम नके, त्रिवेदी काका, खुशाल कुटे आणि असंख्य विहिंप, बजरंग दल, भाजपा, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.