चंद्रपूर,
vhps-protest : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने शनिवार, 27 डिसेंबर रोजी सायंकाळी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बांगलादेशचे पंतप्रधान महंमद युनुस यांचा पुतळा जाळून घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी विहिंपचे जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत म्हणाले, बांगलादेशात दिपूचंद्र दास यांची निर्घृण हत्या आणि हिंदू समाजावर होणारे क्रूर अत्याचार हे मानवतेवरील कलंक आहेत. धर्मांध जिहादी विचारसरणी असलेल्या घटकांनी मंदिरांची विटंबना करणे, मातृशक्तीवर अत्याचार करणे आणि हिंदूंची ओळख पायदळी तुडवणे हे प्रयत्न असह्य झाले आहेत. ही वेळ गप्प राहण्याची नाही, तर एकजुटीने उभे राहून तीव्र निषेध नोंदवण्याची वेळ आहे. प्रत्येक हिंदू, प्रत्येक तरुण, प्रत्येक सनातनी आपल्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल. हिंदूंवर होणारा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.
या आंदोलनात वहिंपचे चंद्रपूर विभाग मंत्री पराग दवंडे, जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, सुधीर धकाते, विक्की मंझरे, अभिषेक मोतलग, सचिन मुडे, दामोदर मंत्री, ललित कासट, गोपाल तोष्णीवाल, गुणवंत चंदखेडे, तुषार चौधरी, गोलू पवार, आलोक मंडल, क्रिश चौरसिया, निखिल खंडारे, अंकुश कोडापे, सतीश शेंडे, ऋषभ झाड़े, जितेश पोफली, आकाश कोड़मलवार, सनातन मंडल, गणेश बोट्टावार, दिक्षय ननावरे, संकेत ठाकरे, संजु बलमवार, सोनू पेटकर आदींसह विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गावाहिनी व सकल हिंदू परिषद कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.