तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Deendayal Seva Pratishthan Yavatmal, दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यवतमाळच्या वतीने अतिवृष्टी बाधित शेतकरी कुटुंबातील निवडक मुलांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थीक मदत करण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष कांचन गडकरी यांच्या हस्ते त्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.या मुलांना बोर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरता यावा, विविध विषयांच्या मार्गदर्शिका, शिकवणी व दहावी-बारावीनंतरच्या निवड चाचण्यांचे अर्जर् भरता यावेत यासाठी प्रत्येकी 4 हजार रुपयांची मदत करण्यात आली.
यावर्षी पावसाने महाराष्ट्रात मोठा हाहा:कार उडवून दिला. अनेक जिल्हे अतिवृष्टीने बाधित झाले. या पूरग्रस्त जिल्ह्यातील शेतकèयांची शेती अक्षरशः खरडून निघाली. पेरलेली पिके वाहून गेली. दुबार, तिबार पेरणीचेही काम करावे लागले. शेतीवरचा हा खर्च वाढल्यामुळे या कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो की काय अशी स्थिती आली.
त्यामुळे संस्थेच्या वतीने गुरुवारी कांचन गडकरी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले. दीनदयाल संस्थेच्या उपाध्यक्ष ज्योती चव्हाण, सचिव विजय कद्रे, संचालक नीलिमा मंत्री, डॉ. कविता करोडदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत निळोणा येथील दीनदयाल प्रबोधिनीमध्ये आयोजित या कार्यक्रमास संस्थेच्या शाश्वत विकास प्रकल्पासोबतच स्वयंसिद्धा, किचन गार्डन व अंत्योदय प्रकल्पाचे समिती सदस्य, कार्यकर्ते तथा लाभार्थी उपस्थित होते.