शेतकरी महिला व दोन शेतकर्‍यांचा गौरव

मुख्यमंत्री फडणवीसांनी केला सन्मान

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
devendra-fadnavis : शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शनिवारी आयोजित मुख्य समारंभात अकोला जिल्ह्यातील शेलू येथील सुवर्णा अरविंद गावंडे यांना शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी, अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील गोपाल किसनराव येऊल यांना शेतकरी नेते शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी, वाशीम जिल्ह्यातील खरोळा येथील दीपक सुभाष वरकड यांना डॉ. पंजाबराव देशमुख शेतीनिष्ठ पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानित केले.
 

AMT 
 
 
 
संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख अध्यक्षस्थानी होते तर पद्मभूषण डॉ. विजय भटकर, केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव हे प्रमुख अतिथी आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, आ.प्रताप अडसड, आ.परिणय फुके, आ. संजय कुटे, आ. राजेश वानखडे, आ. प्रवीण तायडे, आ. उमेश यावलकर, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटेयावेळी अतिथी म्हणून उपस्थित होते. याचवेळी प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे यांनी दिलेल्या दाननिधीतून कस्तुरबा शाळेतील भक्ती गजानन चौधरी हिला ‘डॉ.पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
//विविध शिष्यवृत्तीचे वितरण
 
 
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील जयश्री प्रवीण चितारे व साक्षी दिलीप सोरते हिला श्रीमती विमलाबाई देशमुख अभ्यासवृत्ती, श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील अश्विनी दीपकसिंग पवार व ऋतुजा भास्कर घोडके, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयातील स्वामिनी महेश धर्माळे व श्री शिवाजी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पायल राजेंद्र देशमुख हिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली.
 
 
पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गजाननराव पुंडकर, अ‍ॅड. जे. व्ही. पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेशदादा खोटरे, प्रा. सुभाष बनसोड, संस्थेचे सचिव डॉ. वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, विजय ठोकळ, प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ, प्राचार्य अमोल महल्ले यांनी केले. संचालन डॉ. मनीष गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीव सदस्य, आजी व माजी प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी व विदर्भातून आलेले विविध जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.