कोणाला किती जागा? कल्याण–डोंबिवलीत ठाकरे गट–मनसेत युती

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
कल्याण–डोंबिवली,
Kalyan-Dombivli municipal elections येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून, दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. 122 पैकी 54 जागांवर मनसे तर उर्वरित 68 जागांवर ठाकरे गट आपले उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुखांनी दिली.
 
 

Kalyan-Dombivli municipal elections  
ठाकरे गटाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कल्याणमधील राजकीय परिस्थिती लक्षात घेता मनसे आणि ठाकरे गट यांचा एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांमधील वाटाघाटी अत्यंत सकारात्मक पद्धतीने पार पडल्या असून, या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्येही मनोमिलन झाले आहे. बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून करण्यात आली.
मनसेने ज्या Kalyan-Dombivli municipal elections  जागांची मागणी केली होती, त्या जागा शिवसेनेच्या वतीने सोडण्यात आल्या आहेत, तर काही जागांबाबत ठाकरे गटाने केलेल्या आग्रहामुळे मनसेनेही मागे घेतले. मनसेचे नेते राजू पाटील यांनी 122 पैकी 54 जागांची मागणी केली होती. यामध्ये विशेषतः कल्याण पश्चिमेतील 12–13 जागांवर मनसेचे उमेदवार रिंगणात असतील, तर उर्वरित जागांवर ठाकरे गट आपले उमेदवार उभे करणार आहे.शिवसेना आणि मनसेची ही युती महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवणे हे उद्दिष्ट ठेऊन करण्यात आली असून, युतीच्या पॅनेलमध्ये सक्षम उमेदवार असल्यास त्यांना संधी देण्यात येईल, असेही नेत्यांनी स्पष्ट केले. शंभर टक्के जागावाटप पूर्ण झाल्याचे सांगितले असून दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे.
 
 
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस Kalyan-Dombivli municipal elections  किंवा इतर कोणत्याही पक्षासोबत चर्चेसाठी तयारी ठेवण्यात आली असल्याचे सांगितले गेले; मात्र, अद्याप कोणत्याही पक्षासोबत अधिकृत चर्चा झालेली नाही. यावेळी महायुतीवरही जोरदार टीका करण्यात आली. भाजप–शिवसेना महायुती स्वतःच्या ओझ्याने पडणार असल्याचा दावा करत, पक्षात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग केलेल्या लोकांना न्याय कसा मिळणार, हे महाराष्ट्र पाहणार, असा टोला लगावण्यात आला.आता कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे, विशेषतः शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये युती होणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.