कोल्हापूरी बंधार्‍याचे बॅरेजमध्ये रुपांतर करा

पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी संचालकाकडे मागणी

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
रिसोड,
Kohlapuri dam तालुयातील मसलापेन कोल्हापूरी बंधार्‍यांचे बॅरेजमध्ये रुपांतरण करणे तसेच बेलखेडा, धोडप, भापूर, करिता असलेला तत्वतः मान्यतेचा प्रस्ताव कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचेकडुन अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती लखनसिंह ठाकूर यांनी दिली.
 

fghdf 
बॅरेजकरिता लागणारे पाणी हे मसलापेन कोल्हापूरी बंधार्‍याचे १.१३ दलघमी व रद्द झालेल्या कळमगव्हाण ल.पा. योजनेचे २.७४४ दलघमी असे एकुण ३.८७४ दलघमी उपखोर्‍यामध्ये उपलब्ध आहे. वाशीम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून, वाशीम जिल्ह्यामध्ये कुठल्याही सिंचनाचा मोठा प्रकल्प उपलब्ध नाही. त्यातल्या त्यात रिसोडमध्ये तर मोठा प्रकल्प नसल्याकारणाने कायम रिसोड तालुका सिंचनच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. मागील अनेक वर्षापासून आम्ही पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे, याकरिता प्रयत्न करीत आहोत. रिसोड तालुयातील प्रकल्पाकरिता मसला पेन बॅरेज करिता प्रकल्पास पाणी उपलब्ध असून तत्वतः मान्यता मिळाल्यास रिसोड तालुयास ९०० हेटर सिंचनाचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे जिल्हाचा सिंचनाचा अनुषेश कमी होण्यास मदत मिळू शकते.
सदर प्रस्तावास मान्यता देण्याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावे जेणेकरुन प्रकल्पास लवकरात लवकर मान्यता मिळून जिल्ह्यास सिंचनाचा लाभ मिळेल व रिसोड तालुयातील मसला पेन, धोडप, भापूर, बेलखेड बॅरेजेसचा प्रश्न मार्गी लागेल. यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सोनटक्के यांना प्रत्यक्ष नागपूर येथील कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विभाग नागपूर यांनी लवकरच सदर प्रस्ताव मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठवून पाठपुरावा करून लवकरात लवकर तत्वतः मान्यता मिळवून देण्याचे लखनसिंह ठाकुर यांना आश्वासित केले.