अनिल कांबळे
नागपूर,
mother son suicide case, नागपूर मधील सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॅाटेल लिजेंट इन मध्ये आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेत मुलाचा मृत्यू तर आई गंभीर आहे. आईचे नाव जयंती तर मुलाचे नाव सुरज, दोघेही बेंगलूरू येथेील रहिवासी. सुरजचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. सुरजच्या पत्नीने बेंगलूरू मध्ये गुरुवारी आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा आरोप करत मृत तरुणीच्या नातेवाईकांनी बेंगलूरू येथील स्थानिक पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते. mother son suicide case, दरम्यान बेंगलूरू मध्ये आंदोलन सुरु असतांना आई आणि मुलगा नागपुरात दाखल झाले होते. दोघांनीही स्थानिक हॅाटेल मध्ये मुक्काम केला होता. याच होटेल मध्ये दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेत तरुणाचा मृत्यू झाला तर आईवर उपचार सुरू आहेत.