मोतीबाग येथे डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Sri Kalimata Cricket Club श्री कालीमाता क्रिकेट क्लब, इतवारी, नागपूर यांच्या वतीने सलग ११ वर्षांपासून आयोजित करण्यात येणारी एकदिवसीय डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी मोतीबाग फुटबॉल स्टेडियम, नागपूर येथे होणार आहे.

roshan 
 
 
या स्पर्धेत शहरासह बाहेरील ८ नामांकित संघ सहभागी होणार असून उद्घाटन सामन्यात इमामवाडा विरुद्ध अमरावती ११ हे संघ आमनेसामने येणार आहेत.Sri Kalimata Cricket Club विजेत्या संघाला १.२० लाख, तर उपविजेत्या संघाला ८० हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.उद्घाटनाला चंचल परमान, तर अंतिम सामन्यास पुरुषोत्तम कावळे उपस्थित राहणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष अरुण घडई व प्रचार प्रमुख श्रीकांत रॉय यांनी दिली.
सौजन्य:डॉ. प्रवीण डबली,संपर्क मित्र