शिक्षक भरती परीक्षेत नाव नंबर आणि मेल चुकलेल्यां उमेदवारांना करता येणार नोंदणी

*केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
बुलडाणा, 
prataprao-jadhav : शिक्षक भरती परीक्षा( टीईटी २०२५ ) चा अर्ज भरताना उमेदवारांनी दिलेले नाव, मोबाईल नंबर, मेल किंवा अन्य कारणांनी काही चूक झालेली असल्यास टीईटी परीक्षा देऊन नोंदणीसाठी पात्र ठरूनही नोंदणी करता येत नव्हती केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्र शिक्षण परिषदेकडे पाठपुरावा केला यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे त्यामुळे आता पात्र उमेदवारांना आता दुरुस्ती करता येणार आहे त्यामुळे राज्यातील हजारो उमेदवारांना फायदा होणार आहे.
 
 
 
BUL
 
 
 
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे दोन मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंद केला आहे व मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्व प्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याचे अनेक उमेदवारांनी या संदर्भात केंद्रीय आयुष आरोग्य व कडून राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन या संदर्भाची विनंती केली होती आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे शिक्षण आयुक्त बेडसे त्यांच्याशी संपर्क साधून उमेदवारांच्या अडचणी त्यांना सांगितले होते व यामध्ये योग्य तो मार्ग काढण्यासंदर्भात सुचित केले होते या संदर्भात एक परिपत्रक शिक्षण परिषदेच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे.
 
 
 
ज्या उमेदवारांचा परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी त्यांनी टीईटी २०२५ साठी नोंद केलेल्या ई-मेल आयडी वरून त्यांनी विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पैनकार्ड, वाहन बालविण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र तसेच परीक्षा क्रमांक व टीईटी २०२५ परीक्षेचा नोंदणी क्रमांक, नवीन मोबाईल क्रमांक विषय ई-मेल केल्यास अशा उमेदवारांना स्व प्रमाणपत्र यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येणार आहे सर्व पात्र टीईटी धारकांनी नोंदणी करून घ्यावी यात काही अडचण असल्यास शिक्षणाधिकारी यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.