भारतीय बौद्ध महासभेतर्फे विदर्भ स्तरीय धम्म परिषद

३० डिसेंबर ते ११ जोनवारीपर्यंत आयोजन

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
हिंगणघाट,
Vidarbha Dhamma Conference, येथील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ३० डिसेंबर ते ११ जानेवारी २०२६ पर्यंत विदर्भ स्तरीय भव्य धम्म परिषद येथील सम्यक बुद्ध विहार व म्युनिसिपल नूतन शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या धम्म परिषदेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
 

Vidarbha Dhamma Conference, 
३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारीला समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन असून यावेळी मेजर जनरल विजय हिवराळे अकोला व ज्योती धुरंधर हे प्रशिक्षण देणार आहेत. १ जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमानिमित्त सकाळी ८.३० वाजता मानवंदना, दुपारी ४ वाजता समता सैनिक दलाचा समारोप कार्यक्रम होईल. २ ते ११ जानेवारीला श्रामणेर प्रशिक्षण शिबिर व धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत होईल. मार्गदर्शन बौद्ध धर्म प्रवचनकार व केंद्रीय प्रशिक्षण प्रमुख मुंबई एम. डी. सरोदे तर धम्म उपासिका शिबिराला कौसल्या मेश्राम, रमा सोनपिंपळे, अनिता कांबळे, ज्योत्सना वासनिक मार्गदर्शन करतील.
 
 
३ जानेवारीला Vidarbha Dhamma Conference,  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी प्रा. अस्मिता दारूंडे तर प्रमुख मार्गदर्शक प्रियदर्शना भेले राहतील. ४ रोजी अभिधम्म या विषयावर डॉ. जयंत दुधे मार्गदर्शन करतील. ५ जानेवारीला २ वाजता अमृतवाणी कार्यक्रम होईल. यावेळी जागतिक शांतता पुरस्कार भूषण प्राप्त महाथेरो करुणानंद यांची धम्मदेसना व दुपारी ४ वाजता डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या जयंतीचा कार्यक्रम होईल. ६ रोजी २ वाजता जयभीमचे जनक बाबू हरदास एल. एन. यांचा जयंती कार्यक्रम व ४ वाजता भिखूनी महाथेरो, विजया मैत्रिया श्रीलंका यांची धम्मदेसना व सायंकाळी बुद्ध काळातील श्रावस्ती नगरीत घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग ‘पटाचारा’ अभिनेत्री शितल कांबळे (घोडेस्वार), बडनेरा या सादर करतील. ८ रोजी जागतिक धम्मदिन कार्यक्रम, धम्म मेळावा आणि सायंकाळी नाट्य प्रयोग होईल.
 
 
९ रोजी महिलांचा Vidarbha Dhamma Conference,  परिसंवाद, बुद्धकालीन सत्यघटनेवर आधारित महानाट्य, १० रोजी ‘धम्मक्रांती पुढील आव्हाने व उपाय’ या विषयावर परिसंवाद, विद्रोही संत कबीर हे नाटक होईल. ११ रोजी प्रबुद्धनगर येथून धम्मरॅली निघेल. धम्मरॅली शहरातील विविध मार्गाने फिरून कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर हे मार्गदर्शन करतील. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष परशुराम वाघमारे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई, राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय कार्यालय प्रमुख अ‍ॅड. एस. के. भंडारे, यू. जी. बोराडे, एम. डी. सरोदे, विजय चोरपगार मार्गदर्शन करतील. या धम्म परिषदेत संघयान या स्मरणिकेचे प्रकाशन व बौद्धांच्या स्वाभिमानाचा ठराव मंजूर करण्यात येतील. या ठरावाच्या प्रती राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येईल.