गांजाची विक्री करणार्‍यांवर कारवाई

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
वर्धा,
sale-of-marijuana : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणघाट येथील ज्ञानेश्वर वार्डात धाड टाकून ५११ ग्रॅम गांजा व मोबाईल, असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

K  
 
पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहे. त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणार्‍यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. शुक्रवार २६ रोजी पोलिसांचे पथक हिंगणघाट हद्दीत गस्तीवर होते. गुप्त माहितीवरून संत ज्ञानेश्वर वार्ड, शहालंगडी रोड हिंगणघाट येथील लोकेश तांदुळकर याच्या भाड्याच्या खोलीत छापा टाकला.
 
 
त्यावेळी लोकेश तांदुळकर हजर होता. खोलीची झडती घेतली असता गांजा आढळून आला. हा गांजा त्याच्या मालकीचा असून त्याला पारितोष चौधरी रा. संत ज्ञानेश्वर वार्ड याने आणून दिल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून ५११ ग्रॅम गांजा व मोबाईल असा २५ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासोबतच दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखोचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, पोलिस कर्मचारी अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अभिषेक नाईक, विनोद कापसे यांनी केली आहे.