अनिल कांबळे
नागपूर,
hookah-parlors-dance-bars-nagpur : एका माेठ्या राजकीय नेत्याच्या डाबाे पबवर तब्बल 45 दिवसांची बंदीची कारवाई केल्यानंतर शहरातील अन्य पबमालकासह हुक्का पार्लर आणि डान्सबार संचालकही धास्तीत आले आहेत. थर्टीफस्टच्या पार्ट्यांसाठी माेठमाेठे हाॅटेल्स आणि लाॅन सज्ज झाले असून तेथील तरुणाईला हेरण्यासाठी ड्रग्जतस्कर टपून बसले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विमानतळ चाैकातील डाबाे पबमध्ये युवकांच्या दाेन गटात एका तरुणीवरुन वाद झाला. त्यानंतर त्या दाेन्ही गटात पबबाहेर हाणामारी झाली. त्यात एकाचा मृत्यू तर दाेघे जखमी झाले हाेते. या पबमुळे आतापर्यंत अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेला धाेका निर्माण झाला हाेता. ही पार्श्वभूमी लक्षात घेता पाेलिसांनी 45 दिवासांची बंदी डाबाे पबवर लावली आहे. पाेलिसांनी आक्रमक पवित्रा घेताच शहरातील अन्य पब संचालकासह हुक्का पार्लर आणि डान्सबार संचालकही धास्तीत आले आहेत. त्यामुळे येणाèया ‘थर्टी फस्ट’च्या पार्टीसाठी केलेल्या नियाेजन बिघडण्याची चिन्हे आहेत.
पबवर कारवाई हाेताच तरुणाईचा ओढा पुन्हा हुक्का पार्लर आणि डान्सबारकडे वळला आहे. शहरात काही बारमध्ये संगिताच्या नावाखाली डान्सबार चालविल्या जात असल्याची माहिती आहे. या बारमध्ये तरुणी अश्लील हावभाव करुन त्यांच्यावर ग्राहक पैसे उडवित असल्याचे काही व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाले हाेते. त्यानंतर मात्र, पाेलिसांनी आक्रमक भूमिका घेत बारवर कारवाई सुरु केली हाेती. मात्र, सदर, अंबाझरी, बजाजनगर, जरीपटका, सीताबर्डी या पाेलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक हुक्का पार्लर चाेरुन-लपून सुरु आहेत. तर काही हुक्का पार्लरला काही पाेलिस कर्मचाèयांचा आशिर्वाद असल्याची माहिती आहे. डाबाेवर केलेल्या कारवाईनंतर तरुणाईची गर्दी हुक्का पार्लरमध्ये वाढली आहे. त्यामुळे वरिष्ठ पाेलिस अधिकाèयांना गुन्हे शाखेची पथके आणि डीबी पथकाला बाजूला ठेवून कारवाई करणे गरजेचे आहे.