तभा वृत्तसेवा
उमरखेड,
shankar-talangkar : पोफाळी विविध कार्यकारी सोसायटीमधून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रतिनिधी म्हणून शंकर तालंगकर यांची निवड करण्यात आली आहे. अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. त्यासाठी उमरखेड तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांमधून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रतिनिधींच्या निवडी चालू आहेत.
पोफाळी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये 13 संचालक आहेत. बँक प्रतिनिधी पदासाठी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष शंकर तालंगकर विरुद्ध भाजपाचे शुभाष जाधव यांनी नामांकन दाखल केले. दोघांमध्ये झालेल्या निवडणुकीत शंकर तालंगकर 8 मते मिळाल्याने विजयी झाले. यासाठी शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख सतीष नाईक, देविदास खोकले, काँग्रेसचे गंगाराम काळसरे, संतोष राठोड, संतोष तालंगकर, अशोक धोंगडे, सोसायटीचे अध्यक्ष दत्तराव जारंडे यांनी पुढाकार घेतला होता.
निवडणुक प्रक्रीया भालचंद्र सरोदे व कर्मचारी गणेश घोषे यांनी राबवली. ही निवडणूक पोलिस बंदोबस्तात पार पाडली. निवड झाल्यानंतर विजयी जल्लोष करण्यात आला. उत्तम अहिरे, माधव धुमाळे, उमाकांत खोकले, विजय भुसारे, काशिनाथ मुळावकर, कमलेश शिलार, कौशल्या कांबळे, संतोष वाघमारे, गणेश लांडगे, देवानंद ढोरे, यादव डांगे, गोमाजी बुरकुले, शेख जहीर व गावकèयांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.