कारची दुचाकीला धडक; दोन ठार

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
वर्धा,
accident : भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना २६ रोजी नजिकच्या भूगाव परिसरात टी-पॉईंट परिसरात घडली असून या प्रकरणी २७ रोजी सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
WARDHA
 
रवी घनश्याम जयराजे (४८) रा. आनंदनगर वर्धा व पिंकी जयसिंग तोमर रा. इतवारा बाजार वर्धा अशी मृतांची नावे आहेत. रवी जयराजे हे पिंकी तोमर यांच्यासोबत एम. एच. ३२ एस. १९२६ क्रमांकाच्या दुचाकीने वर्धेच्या दिशेने येत होते. दुचाकी भूगाव टी-पॉईंट परिसरात आली असता के. ए. ३५ पी. ६७११ क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात रवी जयराजे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पिंकी या गंभीर जखमी झाल्या. अपघात झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले. अपघाताची माहिती सावंगी पोलिसांना दिली. उपचारादरम्यान पिंकीचाही मृत्यू झाला. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.