हिंगणघाट,
dharmadhwaj-installation : हिंदू समाजाचे एकत्रिकरण करण्यासाठी गावागावातील प्रत्येक वार्डात धर्मध्वजाची स्थापना करणार असल्याचा संकल्प विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला आहे. ‘हिंदू-हिंदू भाई’ या विचाराला समोर करण्याचा प्रयत्न येथील विहिंप, बजरंग दलाच्या वतीने सुरू असून हिंगणघाट येथील माऊलीनगर-३ मध्ये २१ फुटी धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्यात धर्मध्वज स्थापन करण्याची संकल्पना विहिंप विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे यांची असून धर्मध्वज हिंगणघाट शहरातील संपूर्ण वार्डात आणि मंदिराजवळ यावर्षी लावण्यात येणार आहे. या २१ फुटी धर्मध्वज स्थापनाप्रसंगी जिल्हा विहिंप सहमंत्री शरद कोणप्रतिवार, जिल्हा विहिंप धर्मप्रसार प्रमुख अजय भोंग, जिल्हा विहिंप सहसेवा प्रमुख ओमप्रकाश मस्कर, जिल्हा बजरंग दल सुरक्षा प्रमुख प्रशांत तिवारी, हिंगणघाट प्रखंड विहिंप अध्यक्ष सुरेंद्र आगरे, हिंगणघाट शहर विहिंप अध्यक्ष गजानन मसाये, हिंगणघाट प्रखंड मंत्री देवा वाघमारे, हिंगणघाट प्रखंड सहमंत्री अतुल सूर, हिंगणघाट शहर विहिंप मंत्री राम पोतदार, हिंगणघाट प्रखंड मठ मंदिर प्रमुख रवी खंडाळकर, सहप्रमुख महेंद्र खासरे, हिंगणघाट धर्मयात्रा महासंघ विहिंप प्रमुख मारोती सहारे, हिंगणघाट प्रखंड विहिंप सह धर्मप्रसार प्रमुख सुरेश बुराडकर, हिंगणघाट प्रखंड बजरंग दल सहसंयोजक आदर्श सुपारे, समुद्रपूर बजरंग दल प्रखंड सहसंयोजक खुशाल कुटे, हिंगणघाट शहर धर्मयात्रा महासंघ प्रमुख संतोष बघेल, हिंगणघाट शहर विहिंप सह सामाजिक समरसता प्रमुख संदीप मोटवानी, श्याम इडपवार, भाजपाचे पंकज देशपांडे, मुन्ना त्रिवेदी, अभय संचेती, अटल बिहारी, जय आष्टणकर, सागर चांगलानी उपस्थित होते. माऊलीनगर -३ मध्ये झालेल्या धर्मध्वजाचे नियोजन आणि व्यवस्था मोडक आणि हिंगणघाट शहर विहिंप सह मठ मंदिर प्रमुख सूरज वरठी यांनी केली.