इनरव्हिल क्लब नागपूरतर्फे अंध विद्यालयाला ॲक्वागार्ड भेट !

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
नागपूर
Inner Wheel Club Nagpur २७ डिसेंबर २०२५ रोजी इनरव्हिल क्लब नागपूरच्या वतीने बी. आर. मुंडले अंध विद्यालयाला ॲक्वागार्ड भेट देण्यात आला. क्लबच्या अध्यक्ष सुप्रिया जोशी यांच्या नेतृत्वाखाली डिस्ट्रिक्ट चेअरमन रमा गर्ग यांच्या हस्ते हा ॲक्वागार्ड शाळेला प्रदान करण्यात आला.

desh 
 
 
 
या भेटीच्या निमित्ताने, अंध विद्यालयाचे व्यवस्थापक मकरंद पांढरी पांडे यांनी शाळेची माहिती दिली.Inner Wheel Club Nagpur त्यांनी शाळेतील कम्प्युटर लॅब देखील दाखवली आणि सर्व सदस्यांचे आभार मानले. या भेटीमुळे अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळेल, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल.
सौजन्य:मीनाक्षी देशपांडे,संपर्क मित्र