fish hawk गरूड, घार, घुबड, गिधाड आणि बाज आदी पक्ष्यांचा शिकारी पक्ष्यांमध्ये समावेश होतो. हे सर्व पक्षी मांसाहारी असून शिकार करण्यात तरबेज असतात. याच मालिकेत आणखी एका शिकारी पक्ष्याची भर आहे. कैकर असं या पक्ष्याचे नाव आहे. मच्छीमार, मीनखाई घार, मोरघार ईजना, मासेमारी घार, कनेरी, काकणधार, कांतर, मांसी, लंगड्या अशा विविध नावांनी मराठीत प्रचलित असणारा कैकर आकाराने घार या पक्ष्याएवढा असून गडद उदी रंगाचा पक्षी आहे. त्याचे डोकेही उदी पांढरे असून शरीराचा खालचा भाग पांढरा तर छातीवर रुंद असा कंठा शोभून दिसतो. आश्चर्य म्हणजे याच कंठावरून नर कैकर आणि मादी कैकर यांची ओळख पटते कारण दोघेही दिसायला अगदी सारखेच वाटतात.
साधारणपणे नेपाळच्या खोन्यात आढळून येणारे कैकर पक्षी भारत, श्रीलंका, लक्षद्वीप, मालद्वीप आणि अंदमान बेटात मात्र हिवाळी पाहुणे दाखल होतात. मार्च ते एप्रिल हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. नेपाळच्या खोऱ्यासह अन्य ठिकाणी सरोवरे,जलाशय आणि खाडीनजिक त्यांचे वास्तव्य असल्याचे आढळते. कंकर कैकरसारखाच आणखी एक पक्षी आहे कंकर! कंकरला गंडेर, पांढऱ्या बुज्या असेही म्हणतात. पाणथळीतील यापांढऱ्या पक्ष्याचे डोके-मान काळी असून त्याचा आकार कोंबडीपेक्षा थोडा मोठा असतो. नर-मादी दिसायला सारखेच असून त्यांची चोच बाकदार असते. भारतासह नेपाळ-श्रीलंकेत यांचे वास्तव्य असते. कंकरचे दोन प्रकार असतात.दिसतो.fish hawk काळा कंकर आणि चिमणा कंकर. काळा कंकर मध्यम आकाराच्या कोंबडीएवढा असून बाकदार चोच हे याचे वैशिष्ट्य। तर, चिमणा कंकर दुरून काळा दिसत असला तरी, मुळात त्याचा रंग हिरवा आणि तांबूस रंगाची झाक त्याच्या पंखांवर दिसून येते. बाकदार चोचीचा चिमणा कंकरच्या खांद्यावर पांढरी पट्टी असते. हा पक्षीसुद्धा दलदलीच्या ठिकाणी किंवा सरोवरांनजीक दिसतो