मंगरूळनाथ शहरात मतदारांचा सन्मान

साडीआर्थिक मदत व मिठाईचे वितरण

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
मंगरूळनाथ,
Mangrulnath voter honor शहरातील नपच्या निवडणुकीचा निकाल लागला असून, या निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन सहकार्य केले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रा. नंदलाल पवार मित्र मंडळाने साडी, आर्थिक मदत व मिठाई वितरण करून सन्मान केला.

Mangrulnath voter honor
यापूर्वी शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीत जातीच्या समीकरणावर आधारित उमेदवाराला मते दिली जात असे. मात्र, यावेळी उमेदवाराची कार्यशैली व सामाजिक बांधिलकीचा विचार करून मतदारांनी उमेदवाराला पसंती दर्शवली ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते नंदलाल पवार यांनी निवडणुकीचा निकाल पार पडल्यानंतर मतदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने प्रभाग प्रभाग नऊ मधील सर्व नागरिकांचा सत्कार करून आभार मानले. या नागरिक सन्मान सोहळा कार्यक्रमात अजय खिराडे प्रकाश संगत, बाळासाहेब घोडचर, कळवे आदी उपस्थित होते
वाशीम मंगरूळनाथ विधानसभेचे आमदार श्याम खोडे यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता समस्त वाशीम जिल्ह्यातील जनतेचा विकास व्हावा हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली आहे. ही प्रशसनिय व महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन येथील दानशूर व्यक्तिमत्व नंदलाल पवार यांनी श्याम खोडे यांना साडेआठ लाख रुपयाची सोन्याची साखळी देऊन सत्कार केला. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र - कार्यकर्त्यांचा सत्कार करताना उपस्थित