नागपूर,
Nagpur Municipal Corporation election नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी १९४ चिन्ह उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये विविध चिन्हाचा समावेश असून, यात खाद्यपदार्थांच्या चिन्हांचाही वापरण्यात आला आहेत. यात सफरचंद, बिस्कीट, पाव, केक, ढोबळीमिरची, फुल कोबी, नारळ, ऊस, आले, द्राक्ष, हिरवी मिरची, फणस, भेंडी, मका, भुईमूग, पेर, अननस, कलिंगड, आक्रोड, जेवणाची थाळी अशा चिन्हांचा समावेश आहे.
मुक्त चिन्हामधून चिन्हाची निवड
निवडणूक लढविणार्या अपक्ष तसेच अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या मुक्त चिन्हामधून चिन्हाची निवड करता येणार आहे. चिन्ह वाटपाची प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या राखीव उमेदवार उभे करण्याची मुभा राहणार असून, मुक्त चिन्हांची यादी त्यांना लागू राहणार नाही.
चिन्हावरुन मतदान करणे सोपे
राष्ट्रीय स्तरावरील पाच राज्यस्तरीय पाच पक्ष आणि इतर राज्यातील राज्यस्तरीय नऊ पक्षांची चिन्हे राखीव आहेत. यात शिल्लक राहणारी मुक्त चिन्हे अपक्ष उमेदवारांना दिली जातात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराचे नाव मतदारांच्या लक्षात राहीलच असे पण निवडणूक चिन्ह हे मतदारांच्या लक्षात राहते, मतदाराला चिन्हावरुन उमेदवाराला मतदान करणे सोपे पडेल.राज्य निवडणूक आयोगाकडे अमान्य प्राप्त पण नोंदणीकृत अशा ४१६ पक्षानी नोंदणी केली. त्यांना मान्यताप्राप्त पक्ष श्रेणीतील राखीव चिन्हे न देता स्वतंत्र चिन्हे दिली जाणार आहेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाने एकूण राजकीय पक्षांची चिन्हे राखून ठेवली आहेत. अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरताना तीन मुक्तचिन्हे नमूद करणे बंधनकारक असणार असून वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चिन्हे देखील मुबलक येत्या ०२ जानेवारी २०२६ रोजी अर्ज माघारीनंतर आणि त्यानंतर होणार्या निवडणूक चिन्हांच्या वाटपाने ०३ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.
चिठ्या टाकून चिन्ह ठरविण्यात येईल
निवडणूक चिन्ह विशिष्ट क्रम पाळला जातो. ज्यात आघाड्या, फ्रंट यांना मुक्त चिन्हांपैकी अग्रक्रमाने मागणी केलेले चिन्हे देण्यासाठी विचार करावयाच्या आहे परंतु, असे चिन्ह एकापेक्षा जास्त आघाडी, संघटना, यांनी प्रथम अग्रक्रमाने मागितलेले असल्यास चिठ्या टाकून सदर चिन्ह कोणास द्यावे हे ठरविणेत येईल. चिन्ह वाटपामध्ये अपक्षांच्या वरती प्राधान्य मिळू शकेल . मुक्त चिन्हांपैकी झालेनंतर उर्वरित चिन्हे ही अपक्ष उमेदवारांना त्यांनी दिलेल्या अग्रक्रमाचा विचार करून देण्यात येतील.