नागपूर
School Employees Credit Societies शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अग्रगण्य पगारदार पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर डिस्ट्रिक्ट शाळा कर्मचारी पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाशित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर आमदार ॲड. अभिजीत वंजारी, माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, संस्थेचे पदाधिकारी School Employees Credit Societiesव शिक्षण क्षेत्रातील मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.असोसिएशनचे अशोक गव्हाणकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे रमेश काकडे, संस्थेचे अध्यक्ष नरेश कामडे,सेवानिवृत्त शिक्षिका निर्मला कानतोडे, युवा शिक्षक अंशुल जिचकार तथा शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र