पुण्यात 'चर्चा पे चर्चा' रवींद्र धंगेकर कोणती भूमिका घेणार?

प्रणव धनगर अपक्ष निवडणूक लढवणार

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
पुणे,
Raviendra Dhangekar  पुणे महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठका आणि चर्चा सुरू झाल्या, पण जागावाटपावरून मतभेद आणि नाराजीचं वातावरण निर्माण झाले आहे.
 

Raviendra Dhangekar 
विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपच्या जागावाटपावर संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेने (Shivsena) मागितलेल्या जागा भाजपने नाकारल्या असून, ज्या जागांवर कधीही भाजप किंवा शिवसेना निवडून आलेली नाही, त्या जागा भाजपकडून शिंदे गटाला दिल्या जात आहेत. यावरून शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्याच दरम्यान, शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार,Raviendra Dhangekar  भाजपकडून जागावाटपात रवींद्र धंगेकर यांची कोंडी होत आहे. धंगेकर यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांच्या मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून प्रणव धंगेकर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती होणार की नाही, यावर शंका उपस्थित झाली आहे.
 
 
 
 
 

कार्यकर्त्यांचा मान राखला जावा
 
 
रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीच्या तयारीसंबंधी असंतोष व्यक्त करत, युतीतील जागावाटप आणि कार्यकर्त्यांच्या हक्कांचा मुद्दा मांडला आहे. ते म्हणाले, "शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान झाला पाहिजे. फक्त आमच्याच नव्हे, तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान आणि सन्मान मिळायला हवा." यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुण्यातील कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर निवडणुका कोणासाठी लढवायच्या असा सवाल उपस्थित केला.त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपकडून दिल्या गेलेल्या जागांवर आजपर्यंत भाजप किंवा शिवसेनेचा उमेदवार कधीच निवडून आलेला नाही. "ज्या जागांवर आम्ही काय करणार? भाजपने शिवसेनेला दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही," असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.रवींद्र धंगेकर यांनी युतीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला आहे. ते म्हणाले, "आमच्या जागा आम्ही ठरवणार, आमचे उमेदवार आम्ही ठरवणार, पण जर दुसरे पक्ष त्याच जागांवर उमेदवार ठरवत असतील, तर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे." यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून, भाजपसोबतची युती शिवसेनेच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते, असे सांगितले.
 
 
 
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, Raviendra Dhangekar कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जावा लागेल. "आपल्या कार्यकर्त्यांच्या बाजूने निर्णय घेतला पाहिजे," असं ते म्हणाले. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. अंतिम निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांच्या भावना ओळखूनच पक्ष नेतृत्वाने भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील युतीवर सशक्त चर्चांमधून असंतोष आणि नाराजीचं वातावरण निर्माण होत आहे. रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेवरून युतीला आव्हान मिळत असल्याचं दिसत आहे, आणि कार्यकर्त्यांच्या हक्कांचं रक्षण करणं हे आगामी निवडणुकीत महत्त्वाचं ठरणार आहे.