पुणे,
student-love-with-female-teacher-pune महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील एका नामांकित शाळेत घडलेली घटना शिक्षण क्षेत्रासह पालकांनाही हादरवणारी ठरली आहे. नववीत शिकणारी अवघ्या १४ वर्षांची विद्यार्थिनी आपल्या महिला शिक्षिकेच्या इतक्या तीव्र आकर्षणात अडकली की तिने थेट आत्महत्येची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली. हा अत्यंत संवेदनशील प्रकार पुणे पोलिसांच्या विशेष दामिनी पथकाने अतिशय संयमाने, समजुतीने आणि मानवी दृष्टिकोनातून हाताळत मोठा अनर्थ टाळला.

माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या शिक्षिकेला मोबाईलवरून प्रेम व्यक्त करणारे आणि आक्षेपार्ह संदेश पाठवत होती. “तुम्ही दुसऱ्याशी बोलता तेव्हा मला सहन होत नाही,” अशा प्रकारचे भावनिक दबाव टाकणारे मेसेज ती वारंवार पाठवत होती. शिक्षिकेने समज देऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर विद्यार्थिनी अधिकच आक्रमक झाली. तिने ब्लेडने स्वतःच्या हातावर शिक्षिकेचे नाव कोरले, स्वतःला इजा केली आणि आपल्या प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्यास शाळेच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा इशाराही दिला. student-love-with-female-teacher-pune तपासात हेही समोर आले की तिचे वर्तन केवळ त्या शिक्षिकेपुरते मर्यादित नव्हते. वर्गात शिक्षण सुरू असताना ती एकटक शिक्षिकेकडे पाहत राहायची, तसेच कॉरिडॉरमध्ये त्यांचा पाठलाग करत होती. याशिवाय ती आपल्या वर्गातील इतर मुलींनाही ‘आय लव्ह यू’ असे संदेश पाठवून त्रास देत होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर पुणे पोलिसांचे विशेष महिला पथक असलेले दामिनी पथक शाळेत दाखल झाले. प्रकरणाची नाजूकता ओळखून पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई न करता मानसोपचारात्मक मार्ग स्वीकारला. विद्यार्थिनीची मानसिक अवस्था समजून घेत तज्ज्ञांच्या मदतीने तिचे सखोल समुपदेशन करण्यात आले. तिच्या कुटुंबालाही विश्वासात घेऊन, मुलीला या मानसिक गुंत्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, किशोरवयात होणारे हार्मोन्सचे बदल अनेकदा अशा प्रकारच्या अतिरेकी आकर्षणाला कारणीभूत ठरू शकतात. student-love-with-female-teacher-pune अशा प्रसंगी शिक्षा किंवा दडपशाहीपेक्षा योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि उपचार अधिक महत्त्वाचे ठरतात. या प्रकरणात वेळेवर हस्तक्षेप झाल्याने एक गंभीर दुर्घटना टळली, अशी भावना व्यक्त केली जात आहे.