उमरखेडची पारंपरिक ‘टाळका ज्वारी’ला राष्ट्रीय मान्यता

-‘शंकर’ या नावाने नोंदणी -शेतकरी हक्कांचा ऐतिहासिक टप्पा

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
traditional-talka-sorghum : उमरखेड व हदगाव तालुक्यातील पैनगंगा नदी खोèयातील पारंपरिक व स्थानिक शेतकèयांनी अनेक पिढ्यांपासून जतन व संवर्धन केलेल्या टाळका ज्वारी या स्थानिक वाणाला केंद्र शासनाच्या वनस्पती वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क अधिनियम, 2001 अंतर्गत अधिकृत नोंदणी प्राप्त झाली आहे. ही जात आता शंकर या नावाने राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त ओळख प्राप्त होऊन संरक्षित वाणांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली.
 
 
y28Dec-Talaka-Jwari
 
 
 
ही नोंदणी शिवाजी शंकर माने व उमरखेड-हदगाव परिसरातील ज्वारी उत्पादक शेतकरी समुदायाच्या नावाने करण्यात आली आहे. यामुळे पारंपरिक बियाण्यांवरील शेतकèयांच्या हक्कांना राष्ट्रीय स्तरावर कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. शंकर (टाळका) ज्वारी ही कमी पावसात तग धरणारी, रोगप्रतिकारक, पोषणमूल्यांनी समृद्ध असून धान्याबरोबरच कडबा व चाèयासाठी उपयुक्त आहे. अन्नसुरक्षा व जनावरांना चारा उपलब्धतेमुळे जमिनीतील कार्बनचक्र स्थिर राहून पर्यावरणीय समतोल व शाश्वत शेतीला चालना मिळेल.
 
 
 
या यशामुळे उमरखेड तालुक्यात समुदाय बीज बँक, बीजोत्पादन व पारंपरिक वाण संवर्धनासाठी नव्या संधी निर्माण होतील. शंकर या विशेष नावाने व उमरखेडी टाळका ज्वारी या प्रचलित नावाने राज्यस्तर बाजारपेठेत या ज्वारीची ओळख निर्माण होऊन भविष्यात आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी चालना मिळेल. या उल्लेखनीय यशाबद्दल 27 डिसेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे टाळका ज्वारी उत्पादक व पारंपरिक बियाणे संवर्धन करणाèया शेतकरी समूहाचा त्यांच्या ज्वारीला राष्ट्रीय नोंदणी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी, महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे तसेच इतर मान्यवरांकडून शिवाजी माने व अशोक वानखेडे शेतकरी समूहाचा सत्कार करण्यात आला आहे.
 
 
या संपूर्ण प्रक्रियेत माने परिवारासह पैनगंगा नदी खोèयातील सर्व टाळका ज्वारी उत्पादक शेतकरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील शास्त्रज्ञ डॉ. आम्रपाली आखरे, उमरखेड येथील कृषी महाविद्यालय, स्व. भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान, यांचे मोलाचे योगदान लाभले.