सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करावे : विनोद भीमनवर

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड,
Vinod Bhimanwar सहकार क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच कर्मचारी व संचालक मंडळाने प्रत्येक वेळी सजग राहून व समर्पण भावनेने काम करीत राहावे जेणे करून संस्था प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल, असे प्रतिपादन सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद भीमनवार यांनी सहकार भारती वाशीम जिल्हा बैठकीला संबोधित करताना केले.
 

Vinod Bhimanwar 
कारंजा येथील संत गाडगेबाबा पतसंस्था येथे सहकार भारती कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश बागडे, प्रमुख उपस्थितीत सुनील कुर्‍हेकर, कांतीलाल बरडीया, विश्वनाथ राऊत उपस्थित होते. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सहकारी क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यां नी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे समापन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी, सहकार भारती सदस्यता अभियान व सहकार दिवस सर्वत्र साजरा करण्याकरिता तसेच नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. विनोद भीमनवार यांनी वाशीम जिल्हा अध्यक्षपदी प्रकाश बागडे व महामंत्री पदी आशिष तांबोळकर यांचे नावाची घोषणा केली. त्यानंतर महामंत्री आशिष तांबोळकर यांनी वाशीम जिल्ह्यातील सहकार भारती कार्यकारणी घोषित केली. त्यामध्ये उपाध्यक्षपदी कांतीलाल बरडीया, अरुण खंडागळे, सुनिल गुल्हाने, धन्यकुमार बांडे, तानाजी रंजवे, सचिव गजानन जाधव, अतुल धकतोड, कोषाध्यक्ष ब्रिजमोहन मालपाणी, संघटन प्रमुख तुळशीराम निकम, सह संघटन प्रमुख हेमंत जोशी, अरविंद देसाई, बँक प्रकोष्ट प्रमुख हरिष राघवानी, बँक प्रकोष्ट सह प्रमुख अनिल पाकधने, पतसंस्था प्रकोष्ट प्रमुख तुळशीदास हांडे, सह प्रमुख दिपक बसंतवाणी, मनिष थड्डाणी महिला प्रमुख कांता अग्रवाल, महिला सह प्रमुख रुपाली महेश राऊत, विधी प्रकोष्ट प्रमुख अ‍ॅड आशिष नेने, कर्मचारी संस्था प्रमुख किशोर राठोड, संपर्क प्रमुख संतोष धोंगडे, पगारदार संस्था प्रकोष्ट प्रमुख कविश गहाणकरी, कार्यालय प्रमुख अनंतराव जोशी, सदस्य अविनाश नांदगावकर, सुनील देशमुख, अनिल दंडे, रामेश्वर ठाकरे, प्रा. नागनाथ मठपती, राजेश मिटकरी, प्रचार व प्रसार प्रसिद्धी प्रमुख रामदास मिसाळ, कारंजा तालुका अध्यक्ष विश्वनाथ राऊत, उपाध्यक्ष किरीट रायचूरा, मदनलाल जोशी, विजय गाढवे, वाशीम तालुका अध्यक्ष गजानन भेंडेकर यांचे नावाची घोषणा करण्यात आली.
यानंतर प्रकाश बागडे व कांतीलाल बरडीया यांनी मार्गदर्शन केले व सहकार क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी कसे काम करावी यासंदर्भात माहिती दिली. सहकार क्षेत्रात उद्भवणार्‍या अडीअडचणी वर चर्चा करण्यात आली, तद्नंतर विभाग सह प्रमुख सुनील कुर्‍हेकर यांनी वाशीम जिल्ह्यात जास्तीत जास्त सदस्यता मोहित राबविण्याचे सांगून सहकार भारतीचे काम सर्व क्षेत्रात वाढविण्याचे आवाहन केले. बैठकीचे संचालन आशिष तांबोळकर यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथ राऊत यांनी केले.