वर्धेतील ३१ गावांतून जाणार नवा समृद्धी मार्ग

४०६.५ हेटर खाजगी जमीन होणार अधिग्रहित

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
वर्धा,
Samruddhi Mahamarg extension नागपूर-मुंबई या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्गामुळे कमी वेळात नियोजित ठिकाणी जाता येते. आता याच महामार्गाचे गडचिरोलीपर्यंत विस्तारीकरण करण्याचे धोरण शासनाचे आहे. हा विस्तारीत नवीन समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्यातील ३१ गावांतून जात असून त्यासाठी जिल्ह्यातील ४०६.५ हेटर खाजगी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.
 

Samruddhi Mahamarg extension 
विस्तारीत नवीन महासमृद्धी महामार्ग जिल्ह्याच्या वर्धा उपविभागातील सेलू तालुयाच्या सेलडोह, डोरली, पिंपरा, पळसगाव (बाई), सिंदी रेल्वे तर हिंगणघाट उपविभागाच्या समुद्रपूर तालुयातील गौळ, मारडा, उमरा, औरंगपूर, कोरी, चाकूर, तांभारी, सुलतानपूर, रामपूर, खंडाळा, गोविंदपूर, आजदा, दहेगाव, रेणकापूर, मुरादपूर, चिखलकोट, तास, लोणार, निंभा, कवठा, शेगाव (गो.), सावंगी (झा.), वासी, आसोला, तिरमलपूर, अलोनी या गावातून जाणार आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यातील ४०६.५ हेटर खाजगी, ६.३३ हेटर वनजमीन आणि २०.४३ हेटर शासकीय जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.
 
 
 
विस्तारीत नव्या समृद्धी महामार्गासाठी संपादित होणार्‍या या जमिनीची मोजणी यंत्रणेकडून युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहे. त्याचा अहवाल वर्धा आणि हिंगणघाट येथील उपविभागीय महसूल अधिकार्‍यांना प्राप्तही झाला आहे. जिल्ह्यातून जाणारा हा ४४.४१५ किमीचा महामार्ग जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी तसेच नागरिकांसाठी फायद्याचाच ठरणार आहे.

कुठल्या उपविभागातील किती जमिनी होणार अधिग्रहित
वर्धा उपविभाग
 
खाजगी जमीन : ६८.९ हेटर
वन जमीन : ००
सरकारी जमीन : २.८५ हेटर
हिंगणघाट उपविभाग
खाजगी जमीन : ३३७.९६ हेटर
वन जमीन : ६.३३ हेटर
सरकारी जमीन : १७.५८ हेटर