ई-केवायसीकडे १५ हजार ३३० शेतकर्‍यांची पाठ

*भरपाईचे १३.३१ कोटी वळते होण्याचे थांबले *८५.३८ टके रकम शेतकर्‍यांच्या खात्यात

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
e-kyc-farmers : यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात तीन ते चारवेळा अतिवृष्टी झाली. यात तब्बल २ लाख ८२ हजार ३११.८ हेटरवरील पिकांचे ३३ टयांपेक्षा जास्त नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने भरपाई जाहीर केली. आतापर्यंत जिल्ह्यातील ८५.३८ टके नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर ई-केवायसीअभावी तब्बल १५ हजार ३३० शेतकर्‍यांच्या बँक खात्यात भरपाईची १३.३१ कोटींची रकम वळती होण्यास ब्रेक लागला आहे.
 
 
KYC
 
 
 
जून महिन्यात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिली. नंतर पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. अंकुरलेले पीक वाढीच्या अवस्थेत असताना जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यावर पूरपरिस्थितीचे संकट ओढावले. या नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन, तूर व कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला. शासनाचे निर्देश आल्यावर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात २ लाख ५६ हजार २५९ शेतकर्‍यांचे २ लाख ८२ हजार ३११.८ हेटरवरील पिकांचे ३३ टयांहून अधिक नुकसान झाल्याचे पुढे आले. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे २४० कोटी १३ लाख १ हजार ७३५ रुपयांची मागणी केली.
 
 
शासनाने हवालदिल शेतकर्‍यांची बाजू लक्षात घेता भरपाई देण्याच्या विषयाला हिरवी झेंडी दिली. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावर ई-केवासयी केलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यात शासकीय मदत वळती करण्यास सुरूवात झाली. आतापर्यंत १ लाख ९३ हजार २७६ शेतकर्‍यांच्या बँक खात्यात १७८ कोटी १० लाख ७१ हजार ८७२ रुपयांची रकम जमा करण्यात आली आहे. मात्र, १५ हजार ३३० शेतकर्‍यांनी ई-केवायसी न केल्याने त्यांच्या वाट्याची १३ कोटी ३१ लाख ६८ हजार ७५० रुपयांची रकम वेळीच वळती होण्याच्या विषयाला ब्रेक लागला आहे.
 
 
३८ हजार ११० शेतकर्‍यांची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीच नाही
 
 
नुकसानीचे सर्वेक्षण केल्यावर २ लाख ५६ हजार २५९ शेतकर्‍यांचे नैसर्गिक संकटामुळे नुकसान झाल्याचे पुढे आले. नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर २ लाख २१ हजार ९८५ शेतकर्‍यांची नोंदणी करण्यात आली. तर ३८ हजार ११० शेतकर्‍यांची अद्यापही ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली नाही.